कोल्हापूर: राहत्या घरी स्वत:ची चिता रचून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. 90 वर्षीय वृद्धेने स्वतःची चिता रचून आयुष्य संपवलं.

कागल तालुक्यातील बामणी या गावात ही धक्कादायक घटना घडली.



कल्लावा दादू कांबळे असं या वृद्धेचं नाव आहे. सोमवारी 13 तारखेला कल्लावा यांनी राहत्या घरी लाकूड-शेणी आणून स्वत:ची चिता रचली. त्यानंतर आग लावून स्वत:ला पेटवून घेतलं अशी माहिती विठ्ठल दादू कांबळे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली.

रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेने कागल परिसरात खळबळ उडाली आहे.

कल्लावा यांनी कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचललं याचा शोध पोलीस घेत आहेत.