मुंबई: टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीचा भाऊ नरेंद्रसिंह धोनी आपल्या भावावर कमालाचा नाराज आहे. त्यांच्या या नाराजीचं कारण धोनीच्या बायोपिकमध्ये त्यांना स्थान दिलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. आपली नाराजी ते फेसबूकच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.

आजच्या सामन्यासाठी टीम इंडिया कालच रांचीत दाखल झाली, मात्र, याचवेळी धोनीच्या भावाने फेसबूकवर पोस्ट करुन एक फोटोही शेअर केला. या फोटोत नरेंद्र धोनी वाळू, सिमेंटचा वापर करुन भिंत बांधत असल्याचं दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.


नरेंद्र धोनींच्या पोस्टला जवळपास 500 जणांनी लाईक केलं आहे. या पोस्ट शिवाय नरेंद्र धोनी अशाच प्रकराचे निराशाजनक पोस्ट करत आहेत. त्यांच्या सर्व पोस्टमधून त्यांना नैराश्याने ग्रासले असल्याचे दिसत आहे.