महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज मुख्य लढती
जालन्यातील 19 ते 23 डिसेंबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 Dec 2018 10:00 PM

पार्श्वभूमी
जालना : महाराष्ट्र केसरी किताबाच्या माती आणि मॅट विभागातल्या कुस्त्यांना आज सुरुवात होत आहे. आज सकाळी पैलवानांची वजनं झाली. संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्यांना सुरुवात होईल. जालन्यातील 19 ते...More
जालना : महाराष्ट्र केसरी किताबाच्या माती आणि मॅट विभागातल्या कुस्त्यांना आज सुरुवात होत आहे. आज सकाळी पैलवानांची वजनं झाली. संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्यांना सुरुवात होईल. जालन्यातील 19 ते 23 डिसेंबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. 1961 पासून या स्पर्धेची सुरुवात झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरुप रोख रक्कम होतं. मात्र 1982 पासून दीड किलो वजनाची चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरवण्यात येऊ लागलं. महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पैलवानाला दोन लाख रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मॅट विभागातील पहिली फेरीच्या मुख्य लढती अभिजीत कटके (पुणे शहर) वि. शिवराज राक्षे (पुणे जिल्हा), विष्णू खोसे (नगर) विरुद्ध विक्रम वडतिले (नांदेड) सचिन मोहोळ (गोंदिया) विरुद्ध गणेश जगताप (हिंगोली) माती विभागातील पहिली फेरीची मुख्य लढत समाधान पाटील (मुंबई) विरुद्ध मुन्ना झुंझुरके (पुणे) संबंधित बातम्या मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं पुण्यात आयोजन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : सागर, आशिष, वेताळ, जोतिबा सुवर्णपदकाचे मानकरी