महाराष्ट्र केसरी : कोणाची सरशी, कोणी धरला घरचा रस्ता?
तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
22 Dec 2018 06:49 PM
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी :
पुणे शहरचा अभिजीत कटके पुढच्या फेरीत. मांडीचे स्नायू दुखावल्याने बुलडाण्याच्या युवराज भोसलेची माघार
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग चौथी फेरी :
नाशिकचा हर्षवर्धन सदगीरकडून सांगलीचा विष्णू खोसे चीतपट
नाशिकचा हर्षवर्धन सदगीरकडून सांगलीचा विष्णू खोसे चीतपट
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग चौथी फेरी :
अभिजीत कटके (पुणे शहर) विजयी वि. गणेश जगताप (हिंगोली). दुखापतीनंतर गणेशची माघार
अभिजीत कटके (पुणे शहर) विजयी वि. गणेश जगताप (हिंगोली). दुखापतीनंतर गणेशची माघार
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग उपांत्य फेरी :
हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. अतुल पाटील (जळगाव)
आणि
रवींद्र शेंडगे (सोलापूर) वि. अभिजीत कटके (पुणे शहर)
हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. अतुल पाटील (जळगाव)
आणि
रवींद्र शेंडगे (सोलापूर) वि. अभिजीत कटके (पुणे शहर)
महाराष्ट्र केसरीत व्यत्यय, दुपारचं सत्र थांबवलं. अभिजीत कटके-गणेश जगताप यांच्या निकालाबाबत आक्षेप. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी मातीच्या आखाड्यावर मांडलं ठाण
महाराष्ट्र केसरीत व्यत्यय, दुपारचं सत्र थांबवलं. अभिजीत कटके-गणेश जगताप यांच्या निकालाबाबत आक्षेप. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी मातीच्या आखाड्यावर मांडलं ठाण
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत व्यत्यय, कटके आणि जगतापच्या कुस्ती निकालावर आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांचं आखाड्यावरच ठाण, अर्जुन खोतकर यांची मध्यस्थी
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी :
हिंगोलीचा गणेश जगतापची कोल्हापूरच्या कौतुक डाफळेवर 9-7 ने मात, गणेश चौथ्या फेरीत
महाराष्ट्र केसरी माती विभाग तिसरी फेरी :
संतोष दोरवड (रत्नागिरी) चौथ्या फेरीत, सुरेंद्र खांडेकर (धुळे)वर मात
संतोष दोरवड (रत्नागिरी) चौथ्या फेरीत, सुरेंद्र खांडेकर (धुळे)वर मात
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी :
विष्णू खोसे महेश वरुटेला 5-1 ने हरवून पुढच्या फेरीत
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी :
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला पुढे चाल. बीडच्या अक्षय शिंदेचा डावा गुडघा कुस्तीदरम्यान दुखावल्यामुळे अक्षयची तिसऱ्या फेरीतून माघार. 3-2 अशा आघाडीनंतर अक्षयची दुखापतीमुळे माघार
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला पुढे चाल. बीडच्या अक्षय शिंदेचा डावा गुडघा कुस्तीदरम्यान दुखावल्यामुळे अक्षयची तिसऱ्या फेरीतून माघार. 3-2 अशा आघाडीनंतर अक्षयची दुखापतीमुळे माघार
महाराष्ट्र केसरी माती विभाग उपांत्यपूर्व फेरी
योगेश पवार वि. संतोष दोरवड (रत्नागिरी)
संतोषनं योगेशला केलं चीतपट
संतोष दोरवड मातीच्या उपांत्य फेरीत

महाराष्ट्र केसरी माती विभाग चौथी फेरी
विलास डोईफोडे (जालना) वि. पोपट घोडके (मुंबई उपनगर पश्र्चिम)
पोपट घोडके गैरहजर
विलास डोईफोडे (जालना) वि. पोपट घोडके (मुंबई उपनगर पश्र्चिम)
पोपट घोडके गैरहजर
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग उपांत्य फेरी
हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. अतुल पाटील (जळगाव)
दोघंही अनुपस्थित. वारंवार त्यांच्या नावांची झाली घोषणा
हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. अतुल पाटील (जळगाव)
दोघंही अनुपस्थित. वारंवार त्यांच्या नावांची झाली घोषणा
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग उपांत्य फेरी
अभिजीत कटके (पुणे शहर) वि. रवींद्र शेंडगे (सोलापूर)
अभिजीत कटके (पुणे शहर) वि. रवींद्र शेंडगे (सोलापूर)
महाराष्ट्र केसरी माती विभाग उपांत्यपूर्व फेरी
विलास डोईफोडे (जालना) विजयी वि. संतोष लावटे (कोल्हापूर) ७-३
विलास डोईफोडे (जालना) विजयी वि. संतोष लावटे (कोल्हापूर) ७-३
विलास डोईफोडे (जालना) आणि संतोष दोरवड (रत्नागिरी) यांच्यात महाराष्ट्र केसरी माती विभागाची पहिली सेमी फायनल होईल. माती विभागाची दुसरी सेमी फायनल साईनाथ रानवडे (पुणे शहर) आणि बाला रफिक शेख (बुलडाणा) यांच्यात होईल.
पार्श्वभूमी
तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 61 किलो माती विभागात निखिल कदम आणि सांगलीच्या राहुल पाटील यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत निखिलने सुवर्णपदक आपल्याकडे खेचून आणलं. तर राहुल पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
61 किलोच्या गादी विभागात कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने कल्याणच्या जयेश सांगवीला 10-0 अशा फरकाने हरवून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. 70 किलो गादी विभागात पुण्याच्या शुभम थोरात विरुद्ध स्वप्निल पाटील कोल्हापूर अशा झालेल्या कुस्तीत शुभम थोरातने बाजी मारली. तर, याच वजनी गटात माती विभागातून मछिंद्र निंगुरेला मागे टाकत पुण्याच्या गोकुळवस्ताद तालमीतल्या राम कांबळेने सुवर्णपदक पटकावले.
86 किलोच्या माती विभागात बालाजी येलगुंदेला नमवत कोल्हापुरचा शशिकांत बोगांर्डे सुवर्णवीर ठरला. पुण्याचा अनिकेत खोपडे आणि अहमदनगरचा अक्षय कावरे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यात अक्षय कावरेने बाजी मारत सुवर्णझेप घेतली.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि डार्क हॉर्स होण्याच्या तयारीत आलेला शिवराज राक्षे यांच्यातली लढत, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील, माऊली जमदाडे विरुद्ध संतोष दोरवडे, विक्रम वडतिले विरूद्ध विष्णु खोसे अशा काही चटकादार कुस्त्या आजच्या महाराष्ट्र केसरी विभागात पाहायला मिळाल्या.
अंतिम निकाल :
61 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर) द्वितीय-जयश सांगवी (कल्याण) तृतीय-सागर बर्डे (नाशिक) तृतीय-विजय पाटील (कोल्हापूर)
61 किलो माती विभाग प्रथम- निखिल कदम (पुणे) द्वितीय -राहुल पाटील (सांगली) तृतीय-अरुण खेगळे (पुणे)
70 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- शुभम थोरात (पुणे) द्वितीय - स्वप्नील पाटील (कोल्हापूर)
70 किलो माती विभाग प्रथम- राम कांबळे (कोल्हापूर) द्वितीय- मच्छिंद्र निंगुरे (कोल्हापूर) तृतीय-अरुण खेंगळे (पुणे)
86 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- अक्षय कावरे (अहमदनगर) द्वितीय -अनिकेत खोपडे (पुणे) तृतीय-भैरु नाते तृतीय-विवेक (सांगली)
86 किलो माती विभाग प्रथम- शशिकांत बोगर्डे (कोल्हापूर) द्वितीय-बालाजी यलगुंदे (जालना) तृतीय- दत्ता नसळे (कोल्हापूर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -