मुंबई : वरिष्ठ क्रीडा पत्रकार सुंदरसेन यांनी आपल्या ‘द धोनी टच’ या पुस्तकातून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. सुंदरसेन यांनी धोनीच्या नेतृत्वाबद्दल आणि समोरच्या संघाला गारद करणाऱ्या रणनीतींबाबत आपल्या पुस्तकातून माहिती दिली आहे.
सुंदरसेन यांच्या पुस्तकातून ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमी स्वभावाला साजेशी एक घटना समोर आली आहे. धोनीने 2008 साली एक सामना जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंना जल्लोष करण्यास मनाई केली होती, असं या पुस्तकात म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी केवळ 159 धावांचं आव्हान दिलं.
भेदक गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांनीही दमदार कामगिरी करत भारताला हा सामना जिंकून दिला. पण भारताला विजय मिळण्याआधी एक अचंबित करणारी घटना मैदानात घडली.
भारताला जिंकण्यासाठी केवळ दहा धावांची गरज होती, आणि कर्णधार म्हणून आपला 15 वा सामना खेळत असणाऱ्या धोनीने ड्रेसिंग रुममधून एक निरोप पाठवला. या निरोपातून धोनीने मैदानात असणाऱ्या आपल्या फलंदाजांना सांगितलं की कोणत्याही प्रकारचा जल्लोष करु नका.
यानंतर आम्ही असेच सातत्याने जिंकणार आहोत, असा संदेश या कृतीतून धोनीला कांगारुंना द्यायचा होता. तसंच सामना जिंकल्यानंतर खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना आई-बहिणीवरुन शिव्या देऊ नयेत, अशी धोनीची इच्छा होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडल्यानंतर मैदानात हमखास स्लेजिंग झालेली पाहायला मिळत असे. पण धोनीने आपल्या कृतीतून नवा पायंडा पाडला.
प्रतिस्पर्धी संघावर तोंडसुख घेणाऱ्या आजच्या जगभरातील अनेक कर्णधारांसाठी धोनीची ही कृती धडा शिकवणारी आहे.
खेळात आई-बहिणीवरुन शिव्या धोनीला आवडत नाहीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2018 11:28 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडल्यानंतर मैदानात हमखास स्लेजिंग झालेली पाहायला मिळत असे. पण धोनीने आपल्या कृतीतून नवा पायंडा पाडला.
‘पद्मभूषण’ हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीची एकमताने निवड झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे धोनीशिवाय इतर कुठल्याही क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी बीसीसीआयने केलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -