कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज खेळाडूंकडून टीका सुरु आहे. अशावेळी संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याने पुन्हा एकदा धोनीची पाठराखण केली आहे. 'दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या कर्णधारावर टीका करणाऱ्यांनी आधी आपली कारकीर्द काय होती ते पाहायलं हवं.' अशा शब्दात त्यानं धोनीच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्यासह काही माजी खेळाडूंनी धोनीच्या टी-20 करिअरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
'धोनीवर टीका करण्याआधी लोकांनी आपली कारकीर्द पाहायला हवी. धोनीमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे.' असं शास्त्री यावेळी म्हणाला. तो कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होता.
'विकेटकिपर आणि फलंदाजीमधील त्याची चपळता वाखणण्याजोगी आहे. धोनी इतकं चपळ दुसरं कुणीही नाही. क्षेत्ररक्षणात सध्या भारतीय संघ अव्वल आहे.' असंही शास्त्री यावेळी म्हणाला.
दरम्यान, भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून पहिली कसोटी 16 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध भारत कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
धोनीवर काही लोक प्रचंड जळतात : रवी शास्त्री
धोनीवर टीका करण्याआधी स्वत:ची कारकीर्द पाहा : शास्त्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2017 02:11 PM (IST)
'दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या कर्णधारावर टीका करणाऱ्यांनी आधी आपली कारकीर्द काय होती ते पाहायलं हवं.' अशा शब्दात रवी शास्त्रीनं धोनीच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -