इबिझा : फुटबॉलपटू लायनल मेसी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर निवांत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. भूमध्य समुद्रात इबिझा बेटाजवळ प्रायव्हेट यॉटवर आराम करत असताना अचानक त्याला एक सरप्राईज भेट मिळाली.

 
सुली नावाचा 24 वर्षांचा अॅटलेटिको माद्रिद चाहता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतर पोहून कापत आला आहे. एका अनोळखी व्यक्तीला अचानक आपल्या यॉटजवळ पाहून मेसीही काही काळ बुचकळ्यात पडला.

 

 

सुलीने आपली ओळख आणि भेटीची तीव्र इच्छा बोलून दाखवल्यानंतर मेसीने त्याचं आदरातिथ्य केलं. सुलीच्या इच्छेनुसार मेसीने त्याच्यासोबत सेल्फी काढले आणि ज्युसही दिलं.

 

 

Messi Suli


 
मेसीला याचि देही याचि डोळा पाहण्याची, किंबहुना त्याच्यासोबत काही काळ घालवण्याची देशविदेशातील अनेक चाहत्यांची इच्छा असते. मात्र स्पेनच्या सियुटा शहरात राहणाऱ्या या चाहत्याच्या वाट्याला ही संधी आली. अर्जेंटिनाच्या या स्टारसोबत त्याच्या प्रायव्हेट यॉटमध्ये
सुलीला 20 मिनिटं थांबता आलं.

 

 
इबाझा बेटावर सुट्टी घालवणाऱ्या सुलीला मेसीची यॉट दिसली आणि त्याने मोबाईल प्लास्टिकच्या बॅगेत टाकून पोहत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र समुद्राच्या पाण्यात त्याचा मोबाईल खराब झालाच.