रिओ ऑलिम्पिक: हॉकीमध्ये जर्मनीची भारतावर मात, जर्मनी 2-1 विजयी
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 06:15 PM (IST)
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत जर्मनीनं भारतावर 2-1 अशी मात केली. साखळी फेरीत ब गटाच्या या लढतीत जर्मनीच्या निकलास वेलेननं 18व्या मिनिटाला तर भारताच्या रुपिंदर पाल सिंगनं 23व्या मिनिटाला गोल केले. सामना बरोबरीत सुटणार अशीच चिन्हं होती. पण सामना संपण्यास अवघी 3 सेकंद बाकी असताना रूरनं जर्मनीचा विजयी गोल केला आणि भारताच्या आशा धुळीस मिळवल्या. श्रीजेशच्या टीमनं सलामीच्या लढतीत आयर्लंडला 3-2 असं हरवलं होतं. आयलर्डंला नमवल्यानंतर भारताचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला होता. मात्र, जर्मनीविरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला