पॉवर प्लेमध्ये टी20 क्रिकेटमधील धावांचा विक्रम
टी20च्या इतिहासात बॅटिंग पॉवरप्ले मध्ये पहिल्या 6 ओवरमधील हा सर्वात मोठा धावांचा विक्रम होता. याच्या पूर्वी श्रीलंकेचा ससेक्स विरूद्ध 96 धावांचा विक्रम होता.
या लक्षाचा पाठलाग करताना लँकशायरच्या जॉस बटलर आणि एलवीरो पीटरसनने फलंदाजी करताना पावरप्लेमध्ये 98 धावा केल्या. या इनिंगमध्ये बटलरने धडाकेबाज फलंदाजी करताना 22 बॉलमध्ये 4 षटकार, 7 चौकारांसह 57 धावा केल्या. तर एलविरो पीटरसनने 20 बॉलमध्ये 34 धावा केल्या.
या सामन्यात वूस्टरशायर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 198 धावांचा डोंगर उभा केला
टी20 ब्लास्ट टूर्नामेंटमध्ये लँकेशायर आणि वूस्टरशायर टीमदरम्यान खेळल्या जात असलेल्या या सामन्यात लँकेशायर संघाने सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यावेळी टी20 इतिहासातील पावरप्लेमधील सगळ्यात मोठा धावांचा डोंगर रचला.
क्रिकेट जगतात रोज नवे विक्रम नोंदवले जातात. पण यावेळी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या नेटवेस्ट टी20 ब्लास्टमध्ये इंग्लडच्या मोठ्या फलंदाजाच्या मदतीने टी20मधील धावांचा डोंगर रचला.