माधूरी आणि साक्षीने मला चुकीचं ठरवलं: अनिल कपूर
त्याने यावेळी माधूरी सोबतचा किस्साही सांगितला. माधूरीसोबत मी दोन चित्रपट एकाच वेळी करीत होतो. यावेळी एका चित्रपटात ती ग्रामीण मुलीची भूमिका साकरत होती. या भूमिकेसाठी ती एकदम परफेक्ट होती. पण याचवेळी 1987मध्ये प्रदर्शित झालेल्या हिफाज चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या चित्रपटात तिची भूमिका अतिशय मॉडर्न मुलीची होती. त्यामुळे या भूमिकेबाबत मी साशंक होतो.
अभिनेता आणि निर्माता अनिल कपूरचे म्हणणे आहे की, माधूरी दिक्षित नेने आणि साक्षी तंवर या दोन अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने चुकीचं ठरवलं आहे. बॉलीवूडचे 59 वर्षीय अभिनेता अनिल कपूर टेलिव्हीजन सीरीज 24:सीजम 2ने पुन्हा टिव्हीवर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत कहानी घर घर की ची प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तंवर काम करणार आहे.
या सीरीजमध्ये ती अॅन्टी टेरर स्कॉडची भूमिका निभावत असून, तिच्या अभिनयाने आपण थक्क झाल्याचे त्याने सांगितले. कारण अनिल कपूरच्या मते ती अतिशय अवघड भूमिका होती. साक्षी जेव्हा एखादी भूमिका करीत असते, त्यावेळी त्याचा पूर्ण अभ्यास करूनच करते असेही तो म्हणाला. अनिल म्हणतो की अभिनयामध्ये मला आजपर्यंत दोनच अभिनेत्रींनी खोटं ठरवलं आहे. पहिली म्हणजे, साक्षी आणि दुसरी म्हणजे माधुरी दिक्षित.
अनिल कपूरचे म्हणणे आहे की, या सिझनच्या सुरुवातीला साक्षीसोबत काम करताना साशंक होतो. त्याच्या आगामी 24 या टिव्ही शोच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्याने सांगितले की, जेव्हा या सिझनमध्ये साक्षीसोबत काम करण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी प्रथम मी होकार दर्शवला होता. मी तिच्या कामाबद्द्ल ऐकले होते. तसेच टिव्ही शोमधील तिची सुनेची भूमिकाही पाहीली होती. पण या शोसाठी तिच्या निवडीने थोडी मनात शंका निर्माण झाली होती.
24 सीझन2 चे प्रसारण कलर्स या टेलिव्हीजन चॅनेलनवरून 23 जुलैपासून करण्यात येणार आहे.