रिओ दि जनैरो : महाराष्ट्राच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर तिरंगा डौलानं फडकवत ठेवला आहे. ललितानं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट ठरली आहे. ललितानं प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
ललितानं जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवलं. त्यामुळेच ललिताचा अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी 15 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री पावणेआठ वाजता खेळवली जाईल.