नवी दिल्लीः नोकिया 105 फोन सर्वात मजबूत आणि दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन म्हणून परिचित आहे. हाच फोन आतंकवाद्यांचं खरं शस्त्र आहे. बॉम्बस्फोटांसाठी आंतकवादी अशा दोन फोनचा वापर करतात. एक फोन कॉल करण्यासाठी वापरला जातो. तर दुसरा सिग्नल पाठवण्यासाठी वापरला जातो.
आंतकवाद्यांसाठी हा सर्वात प्रभावी फोन असल्याचं समोर आलं आहे. जगभरात या फोनची किंमत 30 डॉलरपेक्षाही कमी आहे. भारतात हा फोन 900 ते 1400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. कॉन्फ्लिक्ट अर्मामेंट रिसर्च रिपोर्ट नुसार हा फोन आतंकवाद्यांचं प्रमुख शस्त्र आहे.
बाजारात अनेक विविध फीचर्स असणारे फोन आहेत, ज्यांचा वापर आतंकवादी करु शकतात. मात्र आयसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये हाच फोन सर्वाधिक प्रसिद्ध असल्याचं अहवालात सांगितलं आहे.
दमदार बॅटरी बॅकअप आणि कमी किंमत हे हा फोन सर्वाधिक वापरण्यामागचं कारण आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतांना बॉम्बस्फोट कसा घडवून आणतात, हे देखील नोकिया 105 च्या माध्यमातूनचं शिकवलं जातं, असं कॉन्फ्लिक्ट अर्मामेंट रिसर्च रिपोर्ट मध्ये सांगितलं आहे.