मुंबई: बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्या ‘अ’ श्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीनं केली आहे. सोबत सपोर्ट स्टाफच्याही पगारात वाढ व्हावी असंही बीसीसीआयला केलेल्या सादरीकरणात सांगण्यात आलं आहे.
सध्या अ श्रेणीतल्या खेळाडूंना वर्षाला 2 कोटी, ब श्रेणीतल्या खेळाडूंना एक कोटी तर क श्रेणीतल्या खेळाडुंना 50 लाख रुपये मिळतात. प्रशिक्षक कुंबळे आणि कर्णधार कोहलीच्या म्हणण्यानुसार ‘अ’ श्रेणीतले खेळाडू क्रिकेटच्या सर्वच प्रकारात खेळतात, त्यामुळं त्यांना ही वाढ देणं गरजेचं आहे.
दरम्यान, बीसीसीआय कुंबळे आणि कोहलीच्या या प्रस्तावावर सकारात्मक विचार करणार की, प्रस्ताव नाकारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.