नाशिक : नाशिकच्या तहसील कार्यालयात संध्याकाळी अचानक फॅन कोसळल्यामुळे एक कर्मचारी जखमी झाला आहे. फॅन कोसळतानाची घटना तहसील कार्यालयातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


फॅन पडल्यामुळे सेतू सहाय्यक पदावर काम करणारे आडगावकर जखमी झाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरातले सिलींग फॅन सुस्थितीत आहे की नाही याची खातरजमा करुन घ्या.

जर तुमच्या घऱातल्या फॅनची अवस्था नाशिक तहसील कार्यालयातल्या फॅनसारखी असेल तर तो देखील कधीही कोसळू शकतो. सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळयांच्या घरातले फॅन सतत सुरु असतात. त्यामुळे अशा घटना कधी घडतील याचा नेम नाही.

पाहा व्हिडिओ :