मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अमित मिश्राऐवजी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश संघांमधली ही कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.
अमित मिश्राला गुडघ्याच्या दुखापतीमुळं या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. इंग्लंडविरुद्धच्या बंगळुरूच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मिश्राचा गुडघा दुखावला होता.
मिश्राच्या अनुपस्थितीत डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला कसोटी संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रणजी करंडकात कुलदीप उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो.