मुंबई : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं आयसीसीच्या ट्वेन्टी 20 गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. त्यानं या क्रमवारीत तब्बल 20 स्थानांनी झेप घेत टॉप थ्री गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. तर फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने 5 स्थानांची बढती घेत 11व्या स्थानी पोहोचला आहे.
कुलदीपनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी 20 मालिकेत प्रभावी मारा करताना तीन सामन्यांत चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला 23 वरुन थेट तिसऱ्या स्थानावर बढती मिळाली आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान पहिल्या तर पाकचा शादाब खान दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पीनर अॅडम जंपा 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
‘टॉप 5’ ट्वेन्टी 20 गोलंदाज
रशिद खान – अफगाणिस्तान
शादाब खान – पाकिस्तान
कुलदीप यादव – भारत
आदिल रशिद – इंग्लंड
अॅडम जंपा – ऑस्ट्रेलिया
ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप 3’मध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2018 08:22 AM (IST)
ट्वेन्टी ट्वेन्टी गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान पहिल्या तर पाकचा शादाब खान दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पीनर अॅडम जंपा 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -