कोलकाता : भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या डावातल्या 33 व्या षटकांत मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्स या तीन फलंदाजांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडलं.


वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी चेतन शर्मा आणि कपिलदेव या भारतीय गोलंदाजांनी वन डे सामन्यांमध्ये हॅटट्रिक घेतली आहे.

कुलदीपनं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत मॅथ्यू वेडचा त्रिफळा उडवला. त्यानं पुढच्याच चेंडूवर अॅश्टन अॅगरला पायचीत केलं. आणि मग कुलदीपच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक धोनीनं पॅट कमिन्सचा झेल पकडला.