मुंबईः भारताचा कसोटी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आणि हिट मॅन रोहित शर्मा लवकरच शेजारी-शेजारी होणार आहेत. विराटने वरळीमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. रोहितचाही आलिशान फ्लॅट वरळीमध्येच आहे.


 

यापूर्वी रोहित शर्मानेही वरळीतील अहुजा टॉवर्सच्या 29 व्या मजल्यावर आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्यामुळे विराट आणि रोहित शेजारी बनणार हे निश्चित झालं आहे. एवढंच नाही तर युवराज सिंहने सुद्धा विराटने खरेदी केलेल्या टॉवरमध्ये फ्लॅट बुक केलेला आहे. विराटचा फ्लॅट ओपन स्काय बंगलो आहे, तर रोहितच्या फ्लॅटमधून वांद्रे-वरळी सी लिंक आणि शहराचा नजारा दिसतो.

 

रोहित, विराट आणि युवराज शेजारी-शेजारी

रोहित शर्माने मैत्रीण रितीकाशी विवाह झाल्यानंतर वरळीमध्ये 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. अहुजा टॉवरमधील हा फ्लॅट रोहितने 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. विराट कोहलीही मुंबईकर होण्याची वाट पाहत होता. त्याचीही प्रतिक्षा आता संपली आहे. विराटने 35 व्या मजल्यावर 7 हजार 171 स्क्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅट 34 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.युवराज सिंहने 2014 साली विराटच्या टॉवरमध्ये 2014 साली फ्लॅट बुक केला आहे. तिघांचेही फ्लॅट वरळीतच असल्यामुळे ते शेजारी-शेजारी होणार आहेत.

 

संबंधित बातम्याः


रितीकासोबत समुद्रकिनारी राहणार रोहित शर्मा, मुंबईत नवा कोरा फ्लॅट!