भारताच्या केएल राहुलचा अनोखा विक्रम
भारतीय संघाकडून खेळताना राहुलने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावल्याने तो भारतीय क्रिकेटपटूंमध्ये तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनी हा विक्रम नोंदवला आहे.
या सामन्यावेळी राहुलने उत्तम प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. याशिवाय त्याच्या या खेळीने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. जो इतिहास रचणे विराट कोहली किंवा वेस्ट इंडिजचा तडाकेबाज फलंदाज ख्रिस गेललाही जमले नाही.
भारत-वेस्ट इंडिजदरम्यान झालेल्या टी-20 क्रिकेटमधील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी 489ची मोठी खेळी केली. या समान्यात केवळ एका धावेने भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यावेळी दोन्ही संघांनी उत्तम खेळी केली.
कर्णधार धोनीच्या एका चुकीमुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. मात्र, तरीही केएल राहुलच्या उत्तम खेळीने लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये षटकारांच्या मदतीने शतक झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याशिवाय त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.