क्रिकेटप्रेमी 'दिलस्कूप शॉट'ला मुकणार

सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतील दंबुलामधील सामन्यानंतर श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशानने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलशानची 'दिलस्कूप शॉट' ही ओळख होती. दिलशानच्या या शॉटमुळे त्याने अनेक गोलंदाजांना पाणी पाजले. तसेच धावांची कमाई केली.
कुमार संगाकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसुर्या यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा दिलशान हा श्रीलंकेचा चौथा क्रिकेटपटू आहे. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11वा फलंदाज ठरला आहे. तसेच टी 20 क्रिकेटमधील उत्तम प्रदर्शनामळे दिलशानला आयसीसीकडून 2009 सालातील 'प्लेअर ऑफ दी ईअर' या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले होते.
सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतील दंबुलामधील सामन्यानंतर श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशानने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
दिलशान एक यशस्वी फलंदाजासोबत उत्तम गोलंदाजही आहे. त्याच्या उत्तम क्षेत्ररक्षणाच्या कौशल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी-20 प्रकारात त्याची अष्टपैलु खेळाडू म्हणून ओळख होती.
1999 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्धच्या सामन्यातून दिलशानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दिलशानने 330 एकदिवसीय सामन्यात 39.26 च्या सरासरीने 10,290 धावा केल्या.
दिलशानने निवृत्तीचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीच्या दबावखाली घेतल्याचे वृत्त आहे. कारण, श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि संघाचा कर्णधार 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीत आहे. यासाठी श्रीलंका बोर्ड नवी युवा टीम तयार करणार आहे.
आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील शेवटच्या सामन्यात चार चौकारांच्या मदतीने दिलशानने 42 धावांची खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम जम्पा यांनी जॉर्ज बेलीकडून कॅच आऊट केले.