कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 71 धावांनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात कोलकात्याने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं.
आंद्रे रसेलने अवघ्या 12 चेंडूंत सहा षटकारांसह 41 धावांची खेळी उभारली. नितीश राणानेही 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 59 धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकात्याला 20 षटकांत नऊ बाद 200 धावांची मजल मारता आली.
कोलकात्याच्या फलंदाजीनंतर सुनील नारायण आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन विकेट्स काढून दिल्लीचा डाव 129 धावांत गुंडाळला. कुलदीप यादवने ऋषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल यांची महत्त्वपूर्ण भागीदारी तोडत दोघांनाही माघारी धाडलं आणि तिथेच कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.
नितीश राणाची फटकेबाजी
युवा खेळाडू नितीश राणाने ईडन गार्डनवर सर्वांची मनं जिंकली. त्याने 35 चेंडूमध्ये 59 धावा केल्या. एकामागोमाग एक विकेट पडत असतानाही त्याने टिच्चून फलंदाजी केली. तर दुसरीकडे आंद्रे रसेलचं वादळ पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याने 12 चेंडूमध्ये 41 धावा केल्या, ज्यामध्ये 6 षटकारांचा समावेश होता. यापैकी 40 धावा त्याने मोहम्मद शमीच्या नऊ चेंडूंवर केल्या.
ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेलची भागीदारी अपयशी
दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरसह सलामीचे फलंदाज लवकर माघारी परतले. मात्र त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 26 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला ग्लेन मॅक्सवेलने छान साथ दिली. मॅक्सवेलने 22 चेंडूत 47 धावा केला, यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. मात्र या दोन्हीही फलंदाजांना कुलदीप यादवने माघारी पाठवलं.
घरच्या मैदानात कोलकात्याचा शानदार विजय, दिल्लीवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2018 08:01 AM (IST)
कोलकात्याने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात कोलकात्याने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -