नवी दिल्ली : किंग्ज इलेव्हन पंजाब यंदा नव्या शिलेदारांसह आयपीएलच्या रणांगणात उतरणार आहे. पंजाबने नव्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावल्यानंतर आता नव्या नावासाठीही बीसीसीआयकडे मागणी केली आहे. पंजाबने दिग्गज खेळाडूंची फौज जमवली. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये पंजाबला आयपीएल चॅम्पियन होता आलं नाही. पण आता नव्या खेळाडूंसह संघाची बांधणी केल्यानंतर नाव बदलण्याची परवानगी पंजाब संघाच्या फ्रँचायझींनी मागितली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नाव बदलण्याची पंजाबने मागणी केल्याच्या वृत्ताला बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने ही परवानगी दिल्यास पंजाबचा संघ नाव बदलून मैदानात उतरणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच संघ असेल. किंग्ज इलेव्हन पंजाब - (एकूण खेळाडू - 21)
  1. अक्षर पटेल
  2. रविचंद्रन अश्विन
  3. युवराज सिंह
  4. करुण नायर
  5. लोकेश राहुल
  6. डेव्हिड मिलर
  7. अॅरॉन फिंच
  8. मार्कस स्टॉईनिस
  9. मयंक अग्रवाल
  10. अंकित राजपूत
  11. मनोज तिवारी
  12. मोहित शर्मा
  13. मुजीब झद्रान
  14. बरिंदन श्रण
  15. अँड्र्यू टाय
  16. अक्षदीप नाथ
  17. बेन ड्वार्शिअस
  18. प्रदीप साहू
  19. मयंक डागर
  20. ख्रिस गेल
  21. मंजूर डार
संबंधित बातम्या :

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी

आयपीएलच्या रणसंग्रामात सेहवागच्या भाच्याची एंट्री

IPL 2018 : या 10 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही

आयपीएल लिलावात केकेआरच्या या 'मिस्ट्री गर्ल'चीच चर्चा

... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग