Khelo India Youth Games : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून दिली. तसेच वीर अभिमन्यू पुरस्कार विजेत्या किरण वसावे सचिन पवार यांच्या सर्वोत्तम कामगिरी बरोबर नरेंद्रच्य नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारली. महाराष्ट्र संघाने सात गुणांनी पश्चिम बंगाल वर मात केली. महाराष्ट्र संघाचा उपांत्य सामना दिल्ली विरुद्ध रंगणार आहे. तसेच महिला गटाच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक संघ समोरासमोर असतील. दिपाली आणि अश्विनच्या सरस खेळीच्या बळावर महाराष्ट्र महिला संघाने स्पर्धेत विजयाची हॅट्रिक साजरी केली. कर्णधार जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी गटातील शेवटच्या सामन्यात पंजाबला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने एक डाव आणि चार गुणांनी सामना जिंकला. गटातील तिसऱ्या विजयासह महाराष्ट्र महिला संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे.
महाराष्ट्र संघाने दमदार सुरुवात करत पहिल्याच गावात आपला मोठा विजय निश्चित केला होता. नाशिकची निशा वैजल, कोल्हापूरची श्रेया पाटील, उस्मानाबादची अश्विनी शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट केळी करत महाराष्ट्र संघाला पहिल्याच गावात दहा गुणांची आघाडी मिळवून दिली होती. निशाने २: २५ मिनिटे संरक्षण केले. तसेच श्रेयाने १:५० मिनिटे संरक्षण केले आणि दोन विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात पंजाबचे 14 गडी बाद करत आघाडी घेतली. त्यानंतर आपला दबदबा कायम ठेवत महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावातही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सलग तिसऱ्यांदा डावाने विजय साजरा करता आला.
दिपालीच्या 5 विकेट; अश्विनीची 2:51 मिनिट पळती
महाराष्ट्र महिला संघाच्या विजयामध्ये दिपाली आणि अश्विनी शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला डावाने विजय संपादन करता आला. पुण्याच्या दिपालीने पाच विकेट घेतल्या. तसेच तिने डावा दरम्यान १:३० मिनिटे संरक्षण केले. तसेच यादरम्यान अश्विनीने २:५१ मिनिटे सर्वोत्कृष्ट संरक्षण करत गडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंजाब संघाची चांगलीच दमछाक केली.
महाराष्ट्र महिला संघाच्या दबदबा कायम: कोच साप्ते
यंदाच्या पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र महिला संघाची आगेकुच लक्षवेधी ठरत आहे. महाराष्ट्र संघ सामन्यागणिक सर्वोत्कृष्ट कामगिरीतून किताबावरचे आपले वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आगेकूच करत आहे. युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचा दबदबा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र महिला संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.
दिपाली, अश्विनी यांची कामगिरी लक्षवेधी: कोच मुंडे
महाराष्ट्र महिला संघ सरस कामगिरी करत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. यादरम्यान गटातील तिसऱ्या सामन्यात दिपाली आणि अश्विनी यांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे संघाला आपली विजय मोहीम कायम ठेवता आली. या सलग तिसरे विजयाचा महाराष्ट्र संघाने किताब बाबा चे आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे संकेत दिले आहे, अशा शब्दात सहाय्यक प्रशिक्षक संजय मुंडे यांनी संघाचे कौतुक केले आहे.