मेलबर्न: इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननं ऑस्ट्रेलियाला खास सल्ला दिला आहे. एकतर लवकरात लवकर स्पिन गोलंदाजी खेळायला शिका किंवा भारताच्या दौऱ्यावर जाण्याचा विचारच सोडून द्या.

पीटरसननं क्रिकेट डॉट कॉम डाट एयूला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'लवकर स्पिन खेळणं शिका, जर स्पिन खेळणं येत नसेल तर जाऊच नका.' ऑस्ट्रेलिया 23 फेब्रुवारीपासून भारतात पहिली कसोटी खेळणार आहे.



'भारतात खेळायला जाण्याआधी तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागेच. मी ऑस्ट्रेलियातही फिरकीचा अभ्यास करु शकतो. तसं मी केलंही आहे. तुम्हाला स्पिन शिकण्यासाठी तशा खेळपट्ट्यांची गरज आहे असं काही नाही.' असंही पीटरसन म्हणाला. ऑस्ट्रेलिया 23 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध 4 कसोटी सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

दरम्यान, विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इंग्लंडला पाणी पाजलं होतं. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडवर टीम इंडियानं 4-0 नं विजय मिळवला होता. तर नुकताच ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानला 3-0नं  हरवलं होतं.