न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनच्या शिरपेचात मानाचा तुरा
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 01:03 PM (IST)
मुंबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची 'विस्डेन' मासिकानं लीडिंग क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड केली आहे. 2015 सालातील कामगिरीसाठी विल्यमसनला हा बहुमान देण्यात आला. विल्यमसन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करत आहे. विस्डेनचा लीडिंग क्रिकेटर म्हणून विल्यमसनची निवड झाल्याचं कळताच हैदराबादच्या त्याच्या टीममेट्सनी सेलिब्रेशन केलं. विल्यमसनशिवाय गेल्या वर्षातील टॉप फाईव्ह क्रिकेटर्समध्ये न्यूझीलंडचा ब्रेन्डन मॅक्युलम, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ तसंच इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोचीही निवड झाली आहे.