लॉस एंजलिस : डब्लूडब्लूई नो मर्सीमध्ये रविवारी लॉस एंजलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये जॉन सीना आणि रोमन रेन्स यांच्या महामुकाबला झाला. या सामन्यात रोमन रेन्सने जॉन सीनाला फार थकवलं, पण सीनानेही जोरदार टक्कर दिली. अखेर रोमन रेन्सने सीनाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. जॉन सीनाच्या पराभवानंतर सगळीकडून प्रश्न उपस्थित होत आहेत की ही त्याची अखेरची फाईट होती?
यादरम्यान, जॉन सीना 'रॉ टॉक शो'मध्ये दिसला. शोच्या अँकरने विचारलेल्या प्रश्नावर जॉन सीनाने असं उत्तर दिलं की, त्याच्या डब्लूडब्लूई भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तो म्हणाला, "सामना हरल्यानंतर रिंगमध्ये बसल्यावर असं वाटत होतं की, माझ्या खांद्यावरुन मोठं ओझं उतरलं."
https://twitter.com/WWE/status/912155333904101376
इतकंच नाही तर सामना गमावल्यानंतर जॉन सीनाने ट्वीट केलं, ज्यात त्याने केवळ "थँक यू" लिहिलं होतं. चाहते त्याच्या या ट्वीटचा वेगळा अर्थ काढत आहेत. या ट्वीटचा अर्थ निवृत्ती असल्याचं काहींनी म्हटलं तर काही म्हणाले की, "तो आता सिनेमात काम करतोय."
https://twitter.com/JohnCena/status/912166418451357696
टॉक शोमध्ये जॉन सीन म्हणाला की, "मी 40 वर्षांचा आहे आणि माझ्याकडे डब्लूडब्लूईमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे. हा सामन्य स्तरावरील नाही तर एलिट लेव्हलचा आहे. मी डब्लूडब्लूईमध्ये किती काळ खेळू शकेन हे मला माहित नाही."
जॉन फेलिक्स अँथनी सीनाचा जन्म अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इथे 23 एप्रिल 1977 रोजी झाला होता. तो कुस्तीपटू, बॉडीबिल्डर, रॅपर आणि अभिनेता आहे. तो सध्या डब्लूडब्लूईचा भाग आहे.