पंचांच्या वादग्रस्त निर्णयानंतर रुट म्हणतो....
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2017 12:05 PM (IST)
बंगळुरू: कसोटी आणि वन डे सामन्यांच्या धर्तीवर आता ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही बिनचूक निर्णयासाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टिमचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं मत इंग्लंडचा प्रमुख फलंदाज ज्यो रूटनं व्यक्त केलं आहे. भारत-इंग्लंड संघांमधल्या नागपूरच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ज्यो रूटला बाद ठरवण्याचा पंच शमसुद्दिन यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.