झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील धोनीचं कौतुक केलंय आणि सोबतच एक मागणी देखील बीसीसीआयकडे केलीय. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीचं आतापर्यंतच्या खेळासाठी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'धोनी हा संपूर्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा', अशी मागणी सोरेन यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे की, या सामन्याचे साक्षीदार संपूर्ण विश्व असेल. बीसीसीआयनं यासाठी पुढाकार घ्यावा. या सामन्याचं आयोजन संपूर्ण झारखंड करेल, असं त्यांनी म्हटलंय.
MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं
धोनीनं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
संबंधित बातम्या :
MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास