लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्कोला फ्रेन्च ओपनचं विजेतेपद
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 11:46 PM (IST)
पॅरिस: लॅटवियाच्या बिगरमानांकित येलेना ओस्टापेन्कोनं रुमानियाच्या तिसऱ्या मानांकित सिमोना हालेपचं कडवं आव्हान 4-6, 6-4, 6-3 असं मोडीत काढून फ्रेन्च ओपन महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. वीस वर्षांच्या येलेनाची ही कामगिरी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. फ्रेन्च ओपन जिंकणारी ती लॅटवियाची पहिली टेनिसपटू ठरली. तसंच फ्रेन्च ओपनच्या इतिहासात विजेतेपदावर नाव कोरणारी ती पहिली बिगरमानांकित खेळाडूही ठरली. जागतिक क्रमवारीत 47व्या स्थानावर असलेली येलेना गेल्या वीस वर्षांमधली फ्रेन्च ओपनची सर्वात तरुण विजेतीही ठरली.