अहमदाबाद : टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बेपत्ता असलेल्या आजोबांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. 84 वर्षीय संतोक सिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला.
जसप्रीतचे आजोबा शुक्रवारपासून बेपत्ता होते. जसप्रीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उत्तराखंडहून अहमदाबादला आले होते.
संतोक सिंह यांची मुलगी राजेंदर कौर यांनी ते हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. संतोक सिंह यांना जसप्रीत बुमराहला भेटू दिलं नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
5 डिसेंबरला जसप्रीतचा वाढदिवस असतो. मात्र त्यादिवशी आजोबा-नातवाची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे ते जसप्रीतच्या आईच्या शाळेत तिला भेटायला गेले. तिथेही जसप्रीतच्या आईने त्यांची भेट घेण्यास नकार दिला. आमच्या कुटुंबाशी संपर्क करु नका, असंही तिने सांगितलं.
त्यानंतर संतोक यांनी 8 डिसेंबर रोजी आपल्या दुसऱ्या मुलाशी संपर्क करुन आपल्याला जसप्रीतला भेटायची इच्छा असल्याचं सांगितलं. संतोक सिंह 1 डिसेंबरला मुलीच्या घरी पोहचले. बुमराहचा मोबाइल क्रमांकही दिला नाही, असं राजेंदर कौर यांनी सांगितलं.