मुंबई : बँकेत चेक जमा केल्यावर ते पैसे खात्यात वटण्यासाठी लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना आता हद्दपार होणार आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत.
सध्या, स्थानिक (म्हणजे त्याच शहरातला किंवा राज्यातला) चेक असेल, तर तो वटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. तर, परराज्यातील चेक वटण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो. आंतरराष्ट्रीय चेक क्लिअरन्ससाठी तर दोन-दोन आठवडे थांबावं लागतं. मात्र हा कालावधी आता घटणार आहे.
एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजीटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेकचे पैसे काही तासातच तुमच्या खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत. बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे.
चेक क्लिअरिंग हाऊस म्हणजे काय?
चेक क्लिअरिंग हाऊसमध्ये बँकांचे 50 प्रतिनिधी जमतात आणि त्यांच्यामध्ये चेकचं आदानप्रदान होतं. मात्र ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे. सध्या, सकाळी 9.30 वाजल्यानंतर जमा केलेला चेक, दुसऱ्या दिवशी वळता व्हायचा. कारण आदल्या दिवशीचे चेक प्राध्यानाने पाठवले जायचे. मात्र आता तुम्ही संध्याकाळी 5.30 वाजता चेक जमा केला, तरी तासाभरात तो खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत.
वेस्टर्न ग्रीड बँकर्स क्लिअरिंग हाऊस अंतर्गत पहिल्या टप्यात पाच राज्य जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या पाचही राज्यातील बँकांचे धनादेश संगणकावर दिसणार आहेत.
आतापर्यंत, बाहेरील राज्याचा चेक संबंधित बँकेला पोस्टाने पाठवला जायचा. त्यासाठी किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागत असे. त्यामुळे खातेदाराच्या अकाऊण्टमध्ये पैसे जमा होण्यास विलंब व्हायचा. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा धनादेश दुसऱ्याच दिवशी वटणार आहे.
बँकेत चेक जमा केल्यावर खात्यात वटण्याचा अवधी घटणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 10:40 AM (IST)
एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजीटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेकचे पैसे काही तासातच तुमच्या खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -