भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये रविवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात बुमराह खेळण्याची शक्यता आहे. बुमराहच्या कमबॅकची बातमी जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांसह भारतीय क्रीडारसिकांना आनंद झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहच्या कमरेजवळच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली. हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो लंडनला गेला होता. बुमराहला शस्त्रक्रिया करावी लागेल, अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
उपचार घेऊन भारतात परतलेला बुमराह फिटनेससाठी कसून सराव करत आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करेल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.