एकाच वन डे मालिकेत सर्वाधिक विकेट, बुमराने सर्व गोलंदाजांचा विक्रम मोडला
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2017 11:36 AM (IST)
बुमराने श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत 15 विकेट्स घेतल्या. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 15 विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.
कोलंबो : टीम इंडियाने कोलंबोतील वन डेत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत मालिका 5-0 ने नावावर केली. गोलंदाजांनी या संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली. पाचव्या वन डेत भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या, तर संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराने 15 विकेट नावावर केल्या. जसप्रीत बुमराने या वन डे मालिकेत असा विक्रम नावावर केला, जो अद्याप एकाही गोलंदाजाच्या नावावर नाही. बुमराने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 15 विकेट्स नावावर केल्या. यापूर्वी दोन देशांमध्ये खेळवल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक 14 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा जलद गोलंदाज आंद्रे अॅडम्सने 2002-03 साली भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत 14 विकेट्स नावावर केल्या होत्या. तर 2009-10 मध्येही पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज क्लिंट मॅकीने 14 विकेट घेतल्या होत्या. मात्र बुमराने या दोन्हीही गोलंदाजांना मागे सोडत हा विक्रम आपल्या नावावर केला. चौथ्या वन डेत बुमराच्या नावावर 13 विकेट्स होत्या. त्याने पाचव्या वन डेत 15 विकेट पूर्ण करत या विक्रमाची नोंद केली. संबंधित बातम्या :