नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह यांचा आज शुभविवाह पार पडणार आहे. दिल्लीतील एका फार्म हाऊसवर हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग ही वाराणसीची असून भारतीय बास्केटबॉल संघाची ती माजी कर्णधार होती. प्रतिमाच्या बहिणीसुद्धा बास्केटबॉलपटू आहेत.
19 जुन रोजी दिल्लीतील एका सोहळ्यात इशांत आणि प्रतिमाचा साखरपुडा पार पडला होता.
पहिल्या भेटीत प्रतिमाच्या प्रेमात
2011मध्ये बास्टेकबॉल कोर्टवरच इशांत आणि प्रतिमाची भेट होती. रीबा बास्केटबॉल लीगच्या समारोप सोहळ्यात इशांत प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. तिथेच सामन्यादरम्यान प्रतिमाच्या जबरदस्त खेळामुळे इशांत शर्मा प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर तो प्रतिमा भेटला. पहिल्याच भेटीत तो प्रतिमाच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा नकार दिला.
इशांतच्या लग्नात भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंहसह टीम इंडियाचे अनेक आजी-माजी खेळाडू हजर असतील.