मुंबई : टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार लवकरच बोहल्यावर चढणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत.
प्रतिमा सिंगची आई उर्मिला सिंग यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मंगळवारी ईशांत शर्मा वाराणसीत दाखल झाला होता. यावेळी ईशांत आणि प्रतिमा दश्वाश्वमेध घाटावर गंगा आरतीला उपस्थित राहिले होते.
ईशांत आणि प्रतिमा यांचा साखरपुडा 19 जूनला पार पडला होता. प्रतिमा सिंग ही भारताच्या बास्केटबॉल संघाचं प्रतिनिधित्त्व करते. आशियाई खेळांसह अनेक स्पर्धांमध्ये प्रतिमाने देशाचं नेतृत्व केलं आहे.