आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळाल्याने इरफान भावूक
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2017 03:46 PM (IST)
नवी दिल्ली : करिअरच्या सुरुवातीला ज्या खेळाडूची ऑलराऊंडर म्हणून कपिल देव यांच्याशी तुलना केली जात होती, ज्या खेळाडूच्या स्विंगने आणि फलंदाजीने संघात एक नवी उमेद भरण्याचं काम केलं होतं, त्याच खेळाडूला आयपीएल 10 मध्ये खरेदीदार मिळाला नाही. टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू इरफान पठाणवर सततची दुखापत आणि अनेकदा आऊट ऑफ फॉर्म राहिल्याने ही वेळ आली आहे. आयपीएल लिलावात त्याच्यावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. यानंतर इरफानने सोशल मीडियावर आपलं दुःख मांडलं आहे. चाहत्यांसाठी पुन्हा पुनरागमन करु आणि या वाईट वेळेचा संयमाने सामना करीन, असं त्याने म्हटलं आहे. इरफान पठाणची पोस्ट