मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं. आयपीएलच्या बाराव्या मोसमात अंतिम फेरी गाठणारी मुंबई इंडियन्स ही पहिलीच टीम आहे.


आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारण्याची मुंबई इंडियन्सची ही पाचवी वेळ आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 132 धावांचं माफक आव्हान दिलं होतं.

या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला चार बाद 131 धावांत रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. पण या सामन्यात मुंबईच्या यशस्वी पाठलागचा प्रमुख सूत्रधार ठरला तो सूर्यकुमार यादव.

सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकावलंच, पण ईशान किशनच्या साथीने त्याने तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भक्कम भागीदारी रचत मुंबईला विजयाच्या दिशेने नेलं. सूर्यकुमार यादवने 54 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी उभारली.

याआधी, चेन्नई सुपरकिंग्जमधील अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. रायुडूने नाबाद 42, तर धोनीने नाबाद 37 धावांची खेळी उभारली होती.

आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर स्थान मिळालेल्या संघांना क्वालिफायर वन सामन्यात खेळण्याची संधी मिळते. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या फायनलसाठी पात्र ठरला असला तरी पराभूत चेन्नई संघाला फायनलचं तिकीट मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स आणि केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद या आयपीएलमधल्या दोन तगड्या फौजांमध्ये प्ले ऑफमधल्या एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवर आलेल्या संघांमधली प्ले ऑफची लढाई म्हणजेच एलिमिनेटरचा मुकाबला