दिल्ली डेअरडेव्हिलचा किंग्स इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2017 12:03 AM (IST)
दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सनं किंग्स इलेव्हन पंजाबला नऊ बाद 137 धावांत रोखून, आयपीएलच्या सामन्यात 51 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा तीन सामन्यांमधला दुसरा विजय ठरला. या सामन्यात दिल्लीनं पंजाबला विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या भल्यामोठ्या आव्हानाचा दडपणाखाली पंजाबला 20 षटकांत नऊ बाद 137 धावांचीच मजल मारता आली. दिल्लीकडून ख्रिस मॉरिसनं तीन, तर शाहबाज नदीम आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.