IPL 2022 : आजपासून आयपीएलचा कुंभमेळा सुरु होत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रोहित शर्मा त्याच्या स्वप्नाविषयी आणि मदत करणाऱ्या ग्राऊंडमनविषयी बोलत आहे. स्वप्नासाठी झटताना तुम्ही एकटे नसतात, तुम्हाला अनेकजन मदत करतात, असे म्हटले आहे.


आजपासून आयपीएलच्या 15 व्या हंगमाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील एका महत्वाच्या व्यक्तीच्या योगदानाबद्दल माहिती दिली आहे. तो व्यक्ती ग्राऊंडमन असून त्यांचं नाव सुरेश आहे. रोहित शर्मा त्यांना सुरेश दादा म्हणतो. ज्या खेळपट्टीवर रोहित शर्मा क्रिकेट खेळायला शिकला. अगणित तास घालवले. त्या ग्राउंड्समनमुळे क्रिकेट कौशल्यामध्ये निपुण झाला. खेळपट्टीवरील ग्राउंड्समन सुरेश दादा हे रोहित शर्माच्या आयुष्यातील अनोळखी नायक आहेत. ज्यांची रोहित शर्माने आठवण काढली आहे.


आपल्या व्यावसायिक क्रिकेटच्या स्वप्नाबद्दला आठवण काढताना रोहित शर्मा म्हणाला की,  “सुरेश दादा माझ्यामुळे ओव्हरटाईम करायचे आणि रात्री उशिरापर्यंत काम करत होते. जेणेकरून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकेन. जेव्हा तुम्ही मोठे स्वप्न पाहता तेव्हा तुम्ही कधीही एकटे नसता. तुमच्या स्वप्नासाठी अनेकजन झटतात.”


पाहा व्हिडीओ........ 






आयपीएलच्या रणसंग्रमाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई आणि उपविजेते कोलकाता यांच्यात होणार आहे. तर मुंबईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी 27 मार्च रोजी होणार आहे.  


मुंबई इंडियन्स संपूर्ण संघ


रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), फॅबियन अॅलन (75 लाख), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख), रमनदीप सिंह (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख), ऋतिक शौकीन (20 लाख), आर्यन ज्युयल (20 लाख), अनोलप्रीत सिंह (20 लाख).