RCB-W vs MI-W, Match Highlights : महिला आयपीएलच्या (WPL) सलामीच्या हंगामातच दमदार कामगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत आपला अखेरचा लीग सामनाही जिंकला आहे. त्यांनी रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाला 4 विकेट्सनी मात देत प्लेऑफमधील स्थान आणखी मजबूत केलं आहे. सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघानं प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला 125 अवघ्या धावांत रोखलं आहे. ज्यानंतर 126 धावाचं लक्ष्य मुंबईनं 6 विकेट्स गमावत 16.3 षटकांत पूर्ण केलं. यावेळी गोलंदाजीत 3 विकेट्स घेणाऱ्या अमेला केरनं महत्त्वपूर्ण अशी नाबाद 31 धावांची खेळी केली.






सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीला स्वस्तात सर्वबाद करुन निर्धारीत लक्ष्य पार करण्याचा मुंबईचा डाव होता. त्यानुसार अगदी पहिल्या षटकापासून मुंबई संघानं भेदक गोलंदाजी करत एक-एक विकेट घेण्यास सुरुवात केली.  सलामीवीर सोफी शून्यावर बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरला. पण दोघीही अनुक्रमे 24 आणि 29 धावा करुन बाद झाल्या. रिचा घोषने खालच्या फळीत 29 धावांची झुंज दिली. हेदर नाईट आणि कनिका अहुजा यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. ज्याशिवाय इतर खेळाडू दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. दुसरीकडे मुंबईच्या संघाने अफलातून गोलंदाजी केली. यावेळी अमेला केरनं सर्वाधिक 3 तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकनंही एक विकेट घेतली. 


126 धावाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईल तितक्य सहजासहजी हे पार करता आलं नाही. 6 विकेट्स त्यांना गमवावे लागले. विशेष म्हणजे हेली मॅथ्यूज आणि यस्तिक भाटिया यांनी दमदार सुरुवात करुन देत अर्धशतकी भागिदारी देखील केली. पण तरीही दोघीही अनुक्रमे 24 आणि 30 धावा करुन बाद झाल्यावर मोठी भागिदारी इतरांना करता आली नाही. ब्रंटने 13, कॅप्टन कौरने 2 तर पुजा वस्त्रकरने 19 धावा केल्या. पण अमेला केरच्या नाबाद 31 धावा संघाच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या. आता आजच्या दिवसातील दुसरा आणि WPL मधील अखेरचा लीग सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात 7.30 वाजत होणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.


हे देखील वाचा-