WPL 2023 :
सामना कधी होणार?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 14 मार्च रोजी सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कसे असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11?
गुजरात जायंट्सचा संभाव्य संघ : सब्भिनेनी मेघना, लॉरा वोल्वार्ड/सोफिया डंकले, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, जॉर्जिया वेरेहम/अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर
मुंबई इंडियन्सा संभाव्य संघ : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, धारा गुजर/पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
हे देखील वाचा-