UPW-W vs DC-W, Full Match Highlights : युपीचा पराभव करत दिल्लीने वुमन्स आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वुमन्स आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीने युपीचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह दिल्लीचे 12 गुण झाले. दिल्ली आणि मुंबईचे 12-12 गुण झाले होते, पण सरस नेट रनरेटच्या जोरावर युपीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता मुंबई आणि युपी या संघामध्ये 24 मार्च रोजी Eliminator चा सामना होईल. यातील विजेता संघ दिल्लीविरोधात फायनलसाठी खेळणार आहे.
आज झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 139 धावांचे लक्ष मिळाले होते. दिल्लीने हे आव्हान 17.5 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पुन्हा एकदा जबरदस्त सलामी दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 56 धावा जोडल्या. शेफाली वर्माने 21 धावांचे योगदान दिले तर कर्णधान मेग लॅनिंगने 39 धावा चोपल्या. सलामी फलंदाज माघारी परतल्यानंतर जेमिमाही तीन धावा काढून तंबूत परतली. आघाडीचे तीन फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. 70 धावात तीन फलंदाज बाद झाल्यानंतर मरिजाने केप आणि एलिस केप्सी यांनी दिल्लीचा डाव सावरला. मरिजाने केप आणि एलिस केप्सी यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 60 धावांची निर्णायक भागिदारी झाली. मरिजाने केप आणि एलिस केप्सी यांनी प्रत्येकी 34-34 धावांची निर्णायक खेळी केली. यूपीकडून शाबनीम इस्माइल हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युपीकडून एलिसा हीली आणि श्वेता सहरावत डावाची सुरुवात केली. या दोघींनी 30 धावांची सलामी दिली. पहिल्या सहा षटकात युपीला फक्त 38 धावा जोडता आल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी युपीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. ठरावीक अंतराने विकेट घेतल्या. 63 धावसंख्येवर कर्णधार हिली बाद झाल्यानंतर युपीचा डाव कोसळला. त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्यात. परिणामी युपीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ताहलिया मॅक्ग्रा हिने युपीकडून एकाबाजूने किल्ला लढवला. ताहलिया मॅक्ग्रा हिने 32 चेंडूत 58 धावांची खेळी केली. ताहलिया मॅक्ग्रा हिच्या अर्धशतकाच्या बळावर युपीची धावसंख्या 138 पर्यंत पोहचली. दिल्लीकडून एलिस केप्सी हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर राधा यादव हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.