Will MS Dhoni Leave CSK in IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने अलीकडेच एका कार्यक्रमात म्हटले होते की तो इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीझनमध्ये म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. पण, आज त्याने पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात असे एक विधान केले आहे, की त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. माहीने नेमकं काय म्हटलंय? चला जाणून घेऊया.


पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यात नाणेफेक केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला विचारण्यात आले की तो पुढच्या हंगामात त्याच फ्रँचायझीमध्ये राहणार का? ज्यामध्ये तो आयपीएल सुरू झाल्यापासून होता. आयपीएलच्या पुढच्या हंगामापासून 10 संघांचा उल्लेख करताना धोनी म्हणाला, "पाहा, पुढच्या वर्षी तुम्ही मला वेगळ्या पिवळ्या जर्सीमध्ये पाहू शकता. पण मी CSK कडून खेळेल की नाही? या प्रश्नावर अनेक अनिश्चितता आहेत. याचा अर्थ सरळ आहे स्पर्धेत दोन नवीन संघ येत आहेत".


40 वर्षीय धोनी म्हणाला, की "आम्हाला 'रिटेंशन' धोरणाची माहिती नाही. आम्हाला माहित नाही की किती भारतीय खेळाडू आणि विदेशी आम्ही ठेवू शकतो तसेच प्रत्येक खेळाडूच्या पैशाची मर्यादा. त्यामुळे बऱ्याच अनिश्चितता आहेत.


तो पुढे म्हणाला, की जोपर्यंत नियम बनत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला त्याची प्रतीक्षा करावी लागेल आणि आशा आहे की ते प्रत्येकासाठी चांगले होईल.


धोनीच्या प्रतिक्रियेमुळे खळबळ उडू शकते. कारण, धोनीने स्पष्टपणे सूचित केले होते की या आठवड्याच्या सुरुवातीला 'इंडिया सिमेंट्स'च्या 75 व्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये पुढील सीझनमध्ये तो CSK कडून खेळताना दिसणार आहे. जर संघाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला गेला, तर CSK ला त्यांचे तीन खेळाडू (एमएस धोनी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड) कायम ठेवायचे आहेत.