IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासह 22 षटकार ठोकत यादीत पहिले स्थान मिळवले आहे. राहुल नंतर मॅक्सवेल 21 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामात आतापर्यंत 20 षटकार ठोकले आहेत. ऋतुराज या हंगामात तिसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. 


आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २२ षटकार ठोकले आणि यादीत पहिले स्थान मिळवले आहे. त्याच्यानंतर मॅक्सवेल हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मारलेल्या दोन षटकारांच्या मदतीने आता या यादीत 21 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामनात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये 20 षटकार ठोकले आहेत. ऋतुराज या हंगामात तिसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
  
चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरु संघानं आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहेत. दिल्ली 20 अंकांसह टॉपवर आहे तर चेन्नई 18 अंकांसह नंबर दोनवर आहे तर बंगळुरुचे  16 अंक असून तिसऱ्या नंबरवर आहे. आता चौथ्या नंबरसाठी मुंबई आणि हैदराबादमध्ये चुरस असणार आहे. त्यांच्या विजय पराजयावर प्लेऑफ प्रवेशाचं गणित ठरणार आहे. 


हर्षल पटेलकडे पर्पल तर केएल राहुलकडे ऑरेंज कॅप  


यंदाच्या आयपीएलमध्ये 528 धावा बनवून पंजाबचा कर्णधार केएल राहुलनं ऑरेंज कॅप मिळवली आहे. तर 521 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या नंबर शिखर धवन आहे ज्यानं 501 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन 483 धावांसह तिसऱ्या नंबरवर आहे तर  डु प्लेसिस 470 धावांसह पाचव्या स्थानी आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज  हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 13 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत तर  आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 19 विकेट्स घेतल्या आहेत.