Who will win between India and Pakistan in T20 World Cup: जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटमध्ये समोरासमोर येतात, तेव्हा सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत, त्यामुळे दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. 2021 च्या टी -20 विश्वचषकाची सुरुवात भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. क्रिकेटप्रेमी या जबरदस्त सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.


कोण जिंकणार.. आफ्रिदीने दिलं उत्तर
शाहिद आफ्रिदी त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, "पाहा, भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच खूप दबावात खेळ खेळला जातो. जो संघ दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. तो जिंकतो. तसेच जो संघ कमी चुका करतो, त्याच्या जिंकण्याची शक्यता जास्त आहे."


भारत आणि पाकिस्तान एकाच गटात
आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोघांना गट 2 मध्ये ठेवले आहे. याशिवाय या गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दोन क्वालिफायर संघ असतील. 2021 टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा संघ समोरासमोर येतील.


भारताने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात मारली होती बाजी
याआधी, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ अखेरचा सामना खेळले होते. तेव्हाही भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तानला आतापर्यंत एकदिवसीय आणि टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध विजयाची नोंद करता आलेली नाही.



विश्वचषकात भारत कधीही हरला नाही
तुमच्या माहितीसाठी, आजपर्यंत भारतीय संघ एकदिवसीय आणि टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हरला नाही. विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले आहे. भारताला एकदिवसीय विश्वचषकात 7-0 आणि टी -20 विश्वचषकात 5-0 अशी आघाडी आहे.