Axar Patel vs Yuzvendra Chahal : टी20 विश्वचषकासाठी भारतीय ताफ्यात चार फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आलेय. यामधील रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांचं प्लेईंग 11 मधील स्थान निश्चित मानले जातेय. पण तिसरा फिरकी गोलंदाज खेळवण्याची वेळ आलीच तर कुणाला संधी मिळणार? याची जोरदार चर्चा सुरु आहे. अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि चायनामन कुलदीप यादव यांचं संघातील स्थान निश्चित आहे. आता उर्वरित एका जागेसाठी अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्यामध्ये लढत असेल. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून या दोघांपैकी कुणाला स्थान मिळणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


अमेरिकेतील खेळपट्टीवर फिरकीचा दबदबा - 


भारतीय संघ आयर्लंडविरोधात 5 जूनपासून विश्वचषक अभियानाची सुरुवात कऱणार आहे. भारत आणि आयर्लंड संघ नासाऊ क्रिकेट मैदानावर भिडणार आहेत. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्याच मैदानावर भारताचा सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. टीम इंडिया पहिले दोन्ही सामने नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी संथ असल्याचं म्हटले जातेय. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असल्यास तिसऱ्या फिरकी गोलंदाजाची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यामुळे तिसरा फिरकी गोलंदाज कोणता असेल.. याबाबत चर्चा सुरु आहे. अश्विन आणि चहल यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे.


दोन्ही गोलंदाजाची कामगिरी कशी राहिली ?


अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. दोघांनी भेदक मारा केलाय. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दोघांची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे प्लेईंग 11 ची निवड करताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढणार आहे. आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल याने 11 सामन्यात 29.71 च्या सरासरीने 14 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तर अक्षर पटेल यानं 12 सामन्यात 7.33 च्या इकॉनमीने 10 फलंदाजांना बाद केलेय. त्याशिवाय अक्षर पटेल याने फलंदाजीतही कमाल केली आहे. वेळ पडल्यास अक्षर पटेल फिनिशिंगही करु शकतो आणि टॉप ऑर्डरमध्येही फलंदाजी करु शकतो. अक्षर पटेल याचं पारडं जड मानले जातेय. पण रोहित शर्मा चहलचा करिष्मा नजरअंदाज करु शकत नाही. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये तिसरा फिरकी गोलंदाज कोणता ? हे लवकरच स्पष्ट होईल.


2024 टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे शिलेदार कोणते ? 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. 


राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान.