Happy Birthday Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या संघानं आतापर्यंत आठ सामने खेळले असून एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. यातच मुंबईच्या संघानं रोहित शर्मासाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरत आहे. रोहितच्या केकवर हकूना मटाटा असं लिहण्यात आलं होतं. ज्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. तसेच हकूना मटाटाचा नेमका अर्थ काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. 


रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्सच्या संघानं ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात रोहित शर्मा केक कापताना दिसत आहे. या केकवर हॅप्पी बर्थडे रोहित शर्मा, व्ही लव्ह यू, हाकूना मटाटा असं लिहण्यात आलं आहे. 


व्हिडिओ-



हाकूना मटाटा अर्थ काय आहे. 
हाकून मटाटा पूर्वी आफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्या स्वाहिली भाषातील शब्द आहे. सर्व काही ठिक आहे किंवा चिंता नको करूस, असं या शब्दाचा अर्थ आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघ संघर्ष करताना दिसत आहे. मुंबईच्या संघाला प्रोत्साहान देण्यासाठी केकवर हाकूना मटाटा असं लिहण्यात आलं आहे. तसेच मुंबईच्या आगामी सामन्यात खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून देण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. 


रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरी
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 221 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 30.66 च्या सरासरीनं 5 हजार 764 धावा केल्या आहेत.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. परंतु, यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ पहिल्याच विजयाच्या शोधात आहे.


हे देखील वाचा-