SRH vs RCB, IPL 2024 : आरसीबीनं हैदराबादसमोर 206 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकं ठोकली. पाटीदार यानं वादळी अर्धशतक ठोकलं. पण विराट कोहलीनं संथ अर्धशतक लगावले. हैदराबादविरोधात संथ खेळी करणाऱ्या विराट कोहलीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेय. विराट कोहलीनं हैदराबादविरोधात फक्त 118 स्ट्राईक रेटनं अर्धशतक ठोकलं. विराट कोहलीनं 43 चेंडूमध्ये पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 51 धावांची संथ खेळी केली. या खेळीनंतर विराट कोहलीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेय. सेल्फिश विराट कोहली म्हणून विराट कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं 145 च्या स्ट्राईक रेटनं धावांचा पाऊस पाडलाय. पण त्याला हैदराबादविरोधात वेगवान फलंदाजी करता आली नाही.  


विराट कोहली हैदराबादविरोधात पॉवरप्ले ओव्हर्समध्ये वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या 6 षटकात विराट कोहलीने 18 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. पण पॉवरप्ले संपल्यानंतर विराट कोहलीची बॅट शांत झाली. पॉवरप्लेनंतर विराट कोहलीनं 25 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये त्याने फक्त 19 धावा करता आल्या. पॉवरप्लेनंतर विराट कोहलीला एकही चौकार किंवा षटकार मारला नाही, हेही आश्चर्यकारक आहे. विराट कोहलीच्या संथ खेळीची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. नेटकऱ्यांच्या मते, वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मानं 125 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटनं दावांचा पाऊस पाडला होता, तर कोहली फक्त 118 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. 


















विराट कोहली भन्नाट फॉर्मात - 


यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली शानदार फॉर्मात आहे. हैदराबादविरोधात विराट कोहलीने 51 धावांची खेळी करत यंदाच्या हंगामात 400 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या हंगामात 400 धावांचा पल्ला पार कऱणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय. दरम्यान, विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात 67 चेंडूमध्ये शतक ठोकलं होतं. हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ शतक ठरलं होतं. त्यावेळीही विराट कोहलीला ट्रोल करण्यात आलं होतं.