Virat Kohli first Indian batter to complete 13000 runs : सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2025 च्या सामन्यात विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru) खेळत आहे. दरम्यान, त्याने एक नवीन टप्पा गाठला आहे. आता तो टी-20 क्रिकेटमधील टॉप 5 फलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. कोहली बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहत होता. विराट कोहलीने जो पराक्रम केला आहे, तो आतापर्यंत भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही.

विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये केल्या 13 हजार धावा पूर्ण  

खरं तर, आतापर्यंत फक्त 5 फलंदाजांना टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. टी-20 क्रिकेट म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये एकत्रित केलेल्या धावा. भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतात, परंतु इतर फलंदाजही जगभरातील इतर लीगमध्ये भाग घेतात. त्यात त्या धावाही जोडल्या जातात. दरम्यान, विराट कोहलीने आता टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज क्रिस गेल  

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ख्रिस गेल आहे. त्याने 463 सामन्यांमध्ये 14562 धावा केल्या आहेत. यानंतर अ‍ॅलेक्स हेल्स दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 494 सामन्यांमध्ये 13610 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या शोएब मलिकबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 555 टी-20 सामने खेळून 13557 धावा केल्या आहेत. त्यानंतर किरॉन पोलार्डचा क्रमांक लागतो, ज्याने आतापर्यंत 695 टी-20 सामन्यांमध्ये 13537 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 403 सामने खेळून 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 12983 धावा होत्या. याचा अर्थ असा की, त्याला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 17 धावांची आवश्यकता होती, जी त्याने खूप लवकर पूर्ण केली. कोणत्याही भारतीय फलंदाजाने हा टप्पा गाठला नव्हता. विराट कोहलीच्या मागे डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने आतापर्यंत 399 टी-20 सामन्यांमध्ये 12913 धावा केल्या आहेत. वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही, पण तो लीगमध्ये दिसतो. अशा परिस्थितीत त्याला 13 हजार धावा करण्याचीही संधी आहे. पण, तो विराट कोहलीला मागे टाकू शकेल की नाही याबद्दल थोडी शंका आहे.

हे ही वाचा -

IPL 2025 सुरू असताना नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा! 18 खेळाडूंचा समावेश, हायब्रिड करारात 2 खेळाडूंना स्थान, 'हा' खेळाडू बाहेर