Ravi Shastri on Virat : जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज असणाऱ्या विराटच्या खेळी मागील काही काळापासून खास होत नसल्याचं दिसून येत आहे. 2019 पासून त्याने एकही शतक ठोकलं नसून मागील काही महिन्यात त्यानं आयपीएलपासून ते सर्व प्रकारच्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला. आता तो आयपीएलमध्येही खराब कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. 7 आयपीएलसामन्यात त्याने केवळ 119 धावा केल्या आहेत. त्यात मंगळवारी तर तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला काही काळ विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. 'विराट कोहली यानं दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावं, त्याने मानसिक थकवा टाळण्यासाठी ब्रेक घ्यावा', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. गेल्या काही सामन्यांत विराट कोहलीला सूर गवसत नसल्यानंच शास्त्री यांनी हा सल्ला दिला आहे.


विराट आयपीएलमध्ये चौथ्यांदा शून्यावर बाद


लखनौविरुद्ध सामन्यात बंगळुरूचा एक विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पण दुष्मंता चमिराच्या पहिल्या षटकातील सहाव्या चेंडूवर विराट कोहलीनं आपली विकेट्स गमावली. तो एक चेंडू खेळत शून्यावर झेलबाद झाला. याआधी देखील तो आयपीएलमध्ये शून्यावर बाद झाला आहे.


कधी आणि कोणत्या गोलंदाजानं विराटला शून्यावर बाद केलं?


1) अशिष नेहरा (मुंबई इंडियन्स, 2008)
2)संदीप शर्मा (पंजाब इलेव्हन, 2014)
3) नॅथन कुल्टर (कोलकाता नाईड रायडर्स, 2017)
4) दुष्मंता चमिरा (लखनौ सुपर जायंट्स, 2022)


या मोसमातील विराट कोहलीची कामगिरी 


विराट कोहलीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 7 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 48 राहिली आहे. या मोसमात कोलहलीने आत्तापर्यंत 9 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. गेल्या मोसमात विराट कोहलीची बॅट चांगली तळपली होती. त्याने मागील मोसमात 15 सामन्यात 405 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 2010 पासून गेल्या मोसमापर्यंत विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली होती. दरम्यान त्याच्या फॉर्मची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


हे देखील वाचा-